आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्यावर हल्ला:किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, शाईही फेकली; भाजप नेते म्हणाले - हल्लेखोर शिवसेनेचे गुंड

वाशिम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी शिवसैनिकांना हटवले

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज दुपारी वाशिममध्ये हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यात हल्लेखोरांना सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईने हल्ला केला. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना वाशिममधील बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याजवळ घडली आहे. हा कारखाना वाशिमच्या स्थानिक शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांचे असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेत्यांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया हॅंडल ट्विटवरुन दिली आहे. ते म्हणाले की, हा हल्ला शिवसेनेच्या गुंडांनी दुपारी 12.30 वाजता केला. यावेळी माझ्यावर गाडीवर तीने मोठे दगड फेकण्यात आले आहे. यामध्ये माझ्या गाडीची खिडकी आणि मागच्या काच्या फुटल्या. घटनेवेळी गाडीमध्ये आमदार राजेंद्र पाटणी, तेजराव थोरात आणि काही सीआयएसएफचे जवान उपस्थित होते.

भाजप नेत्याच्या ताफ्याला पोलिसांनी याप्रकारे बाहेर काढले.
भाजप नेत्याच्या ताफ्याला पोलिसांनी याप्रकारे बाहेर काढले.

पोलिसांनी शिवसैनिकांना हटवले
गाड्यांचा काफिला या मार्गाने जाणार हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आधीच माहित होते. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर उभे राहून हल्ल्याची तयारी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कार्यकर्त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाहीफेक केली. दरम्यान, पोलिस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हटवले.

या हल्ल्यात कारची खिडकी आणि मागच्या काचा फुटल्या.
या हल्ल्यात कारची खिडकी आणि मागच्या काचा फुटल्या.
बातम्या आणखी आहेत...