आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:बाल शिवाजी शाळेत महात्मा गांधी ;‎ लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा शिक्षण‎ संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक‎ शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल‎ बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात‎ आली. हा कार्यक्रम वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी‎ सादर केला.‎ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून‎ एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या‎ मराठी विभागाच्या सहयोगी शिक्षिका डॉ.‎ स्वाती दामोदरे होत्या. कार्यक्रमात निःस्पृह‎ शास्त्रीजी यांच्याबद्दल माहिती दिव्या चांडक‎ हिने सादर केली.

महात्मा गांधीजींची माहिती‎ स्वर्णाभ लांडगे याने इंग्रजी भाषणातून‎ सांगितली. तसेच ''मोठ्या मनाचा छोटा‎ माणूस ही गोष्ट '' काव्या पाठक हिने‎ सांगितली. दांडी यात्रेचा प्रसंग वर्ग ५ च्या‎ विद्यार्थ्यांनी सादर केला. ''दे दी हमे आजादी''‎ हे गीत वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी सादर केले.‎ कार्यक्रमाचे संचलन सायली कुळकर्णी हिने‎ केले तर प्रास्ताविक शिक्षिका शुभांगी तिडके‎ यांनी केले.

माझी बाल शाळेतर्फे स्व.‎ अण्णासाहेब देव जन्मदिनानिमित्त आयोजित‎ विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी‎ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎ याप्रसंगी डॉ. दामोदरे यांनी ''अच्छा देखो,‎ अच्छा बोलो, अच्छा सुनो गांधीजींच्या या‎ तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी अंगिकाराव्यात.‎ तसेच शास्त्रीजींच्या साधेपणा, निःस्पृहपणा,‎ निर्मोही व्यक्तिमत्वाचा बोध घेऊन‎ विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे आचरण करावे'' असा‎ संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता एकात्मता‎ मंत्राने करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...