आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎:गुलाम नबी आझाद महाविद्यालयामध्ये‎ महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती‎

बार्शीटाकळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाब नबी आजाद महाविद्यालयात ‎राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल‎ बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा‎ कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना मार्फत ‎ ‎ साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. ‎मधुकर पवार यांच्या‎ मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य डॉ.‎ आर. आर. राठोड व उपप्राचार्य डॉ.‎ ए. बी. वैराळे यांच्या उपस्थितीत ‎ ‎ कार्यक्रम आयोजित करण्यात‎ आला.

या वेळी कांचन अंकुलेकर, ‎सुप्रीया गवई इ. विद्यार्थीनी स्वागत‎ गीत गायले. कार्यक्रमाला डॉ. एम.‎ बी. बल्लाळ, डॉ. एस. एस. इढोळे,‎ डॉ. एम. आर. आहीर यांचा सहभाग‎ लाभला. याप्रसंगी रासेयोच्या‎ स्वयंसेवकांची भाषणे झाली. यामध्ये‎ ऋषिकेश चव्हाण, पल्लवी राठोड व‎ गायत्री ढाकुलकर यांचा समावेश‎ होता. स्वातंत्र्य चळवळीच्या‎ काळामध्ये महापुरुषांनी अनेक‎ प्रकारच्या हाल-अपेष्टा सहन‎ केल्या. वेगवेगळे आंदोलने सत्याग्रह‎‎ व इतर अनेक संकटांना त्यांना‎ सामोरे जावे लागले याची आठवण‎ ठेवणे पुढील काळामध्ये आवश्यक‎ आहे असे प्रतिपादन डॉ. एम. बी.‎ बल्लाळ यांनी केले. पुढे महात्मा‎ गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या‎ जीवनावर प्रा. डॉ. ए. बी. वैराळे‎ यांनी प्रकाश टाकला. डॉ. एस. एस.‎ इढोळे व डॉ. राठोड यांनीही‎ मार्गदर्शन केले. पुढील काळात जर‎ शेतीसंबंधित नुकसान व‎ शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचे‎ असतील तर महापुरुषांचे शेती‎ विषयक विचार आत्मसात केले‎ पाहिजे असे प्रतिपादन प्रा. एम. आर.‎ अहिर यांनी केले. कार्यक्रमाचे‎ यशस्वी आयोजन करण्यासाठी‎ रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.‎ व्ही. एस. उंडाळ व डॉ. व्ही. बी.‎ कोटंबे यांनी प्रयत्न केले.‎ कार्यक्रमासाठी प्रा. कुटे, प्रा. वाय.‎ पी. काळे, प्रा. कैलास काळे यांचा‎ पुढाकार होता. सूत्रसंचालन महादेव‎ खंदारे यांनी केले. ‎ गुलाम नबी आझाद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर‎ शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.‎बुलडाणा‎ १५ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वृत्तपत्र‎ विक्रेता दिन म्हणून घोषित करण्याची मागणी ‎वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने ३‎ ऑक्टोबरला निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी ‎यांच्याकडे करण्यात अाली.‎ माजी राष्ट्रपती एपीजे डॉ. अब्दुल कलाम‎ यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस केंद्र ‎सरकारच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस म्हणून‎ साजरा केला जातो. तसेच हा दिवस महाराष्ट्र‎ राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने पाच‎ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून १५‎ राज्यात साजरा केला जातो. त्यामुळे केंद्र‎ सरकारने सुद्धा हा दिवस भारतीय वृत्तपत्र‎ विक्रेता दिवस म्हणून घोषित करावा, अशी‎ मागणी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने‎‎ जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.‎ निवेदन देताना शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे‎ अध्यक्ष समीर शिंदे, उपाध्यक्ष राजू सपकाळ,‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार यांच्यासह‎ शहरातील वृत्तपत्र विक्रेते उमेश देशमुख,‎ वैभव वाघमारे, राहुल डिडोळकर, जगदीश‎ कोथळकर, माधव देशमुख, विशाल मिसाळ‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...