आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने अकोल्यातील बाळापूरमध्ये वीज चोरीच्या 65 जणांवर कारवाई केली आहे. वीज चोरी पकडण्याच्या मोहिमेत अकाेल्यातील बाळापूर शहरात एकूण 31 हजार 463 युनिटच्या वीजेच्या चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहरात वीजबिलाची थकबाकी आणि वीज चोरीचे प्रमाण बघता मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
सशंयित ग्राहकांची तपासणी
वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करूनही वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाची महावितरणकडून आकस्मिक तपासणी करण्यात आली. यामध्ये शहरातील संशयीत 141 ग्राहकांच्या वीज वापराची मीटर तपासणी केली गेली.यामध्ये 65 ग्राहकांच्या घरी वीज चोरी होत असल्याचे आढळले. त्यापैकी 57 वीज चोरीमध्ये अवैध वीजेचा वापर केला गेला असल्याचे समोर आले. 13 ग्राहकांनी मीटरला छेडछाड करून मीटर बंद केले असल्याचे आढळले.
ग्राहकांकडून दंडाची आकारणी
अवैध कारणासाठी वीज वापरलेल्या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 126 नुसार,तर मीटरशी छेडछाड करणाऱ्या 13 ग्राहकांवर कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली आहे. एकुण 2 लाख 93 हजाराच्या वीज चोरीवर 26 हजाराच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच विद्युत कायद्याअंतर्गत शिक्षेचेही प्रावधान या कायद्यात आहे, वीज ग्राहकांनी इतर कुणालाही अवैधरित्या वीज पुरवठा केल्यास, त्यांच्यावरही कारवाई यापुढे करण्यात येणार आहे. मार्च महिना असल्याने महावितरणकडून वीजबिल वसुलीला वेग देण्यात आला आहे. वसुलीसाठी महावितरण कर्मचारी ग्राहकांच्या घरापर्यंत येत आहे. अशा वेळी ग्राहकांनी कर्मचाऱ्यांशी वाद न घालता वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण बाळापूर शहर उपविभागातर्फे करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.