आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज संकट निवारण:रात्रीपासून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला गती; 145 पैकी 120 पेक्षा जास्त गावांत पडला प्रकाश

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका पुन्ह;महावितरणला बसला आहे.अनेक ठिकाणी झाडे,झाडाच्या फांद्या,टिनपत्रे महावितरण खांबावर येऊन पडल्याने १४५ गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. रात्रीपासूनच दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. १२० पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा पूर्वपदावर आला आहे. तर उर्वरित वीज पुरवठा लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.

बाळापूर पारस या ११ केव्ही वाहिनीवर झाड पडल्याने १२ खांब तुटले/वाकल्याने वीज वाहिनी जमिनदोस्त झाली होती.त्यामुळे ३३ केव्ही बाळापूर उपकेंद्र बंद पडले होते.याशिवाय अनेक ठिकाणी टिनपत्रे,झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यावर अडकल्याने ४० ते ५० लघूदाबाचे खांब वीज वाहिन्यासहीत पडले आहे.

पारस येथील चार ठिकाणाचे रोहित्र हे जमिनीलगत झुकले आहे,बाळापूर उपकेंद्राचा वीज पुरवठा रात्रीलाच पुर्ववत करण्यात आला आहे. पारस परिसरात वादळाचा परिणाम जास्त झाल्याने महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे.अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट वीज दुरूस्तीसाठी पारस येथे हजर आहेत.

कडकडाटासह विजा पडल्याने अकोला शहरातील ३३ केव्ही एमआयडीसी,३३ केव्ही सुधीर कॉलनी,३३ खडकी,३३ केव्ही वाशिम बायपास आणि ३३ केव्ही शिवाजी उपकेंद्राशी निगडीत वीज वाहिन्यांवरील ६० ते ७० पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर फुटल्याने हे उपकेंद्रे बंद पडली होती.परंतू काही तासातच शहरातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले.

याशिवाय उपकेंद्रे ते उपकेंद्र जोडणाऱ्या ३३ केव्ही एमआयडीसी ते ३३ केव्ही वणी रंभापूर या वाहिनीवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने ही वाहिनी क्षतीग्रस्त होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता.३३ केव्ही बोरगाव ते ३३ केव्ही कानशिवणी वाहिनीचे दोन पोल पडल्याने वीज वाहिनी बंद पडून वीज पुरवठा खंडित झाला होता.

३३ केव्ही कानशिवणी ते ३३ केव्ही कंझारा लाईनवरील २७ पीन इन्सुलेटर व ६ व्ही ग्लास फुटल्याने वीज वाहिनी तुटली होती.तसेच ३३ केव्ही वणी रंभापूर ते ३३ केव्ही अंभोरा वीज वाहिनीचे २ पोल पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.परंतू या वाहिन्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

ग्राहकांसाठी संपर्क यंत्रणा कार्यरत

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना तक्रार दाखल करण्यासाठी आपात्कालीन परिस्थितीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आणि २४ तास सुरू असणाऱ्या दैनंदिन संनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३३३९ व ७८७५७६३०७० हे मोबाईल नंबरवर कॉल करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.