आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बाळापुरात 65 वीज चोरांवर महावितरणची‎ कारवाई; 31 हजार 463 युनीटची वीज चाेरी‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अनेक िठकाणी वीज चाेरीचे‎ प्रकार घडत असून, वीज चाेरी‎ राेखण्यासाठी महावितरण कंपनीकडून‎ माेहीम सुरू आहे. वीज चोरी‎ पकडण्याच्या मोहिमेत बाळापूर शहरात‎ एकूण ३१ हजार ४६३ युनिट वीज‎ चोरीच्या ६५ वीज चोऱ्या उघड‎ करण्यात आल्या आहेत. शहरात‎ वीजबिलाची थकबाकी आणि वीज‎ चोरीचे प्रमाण बघता मोहिम अधिक‎ तीव्र करण्यात येणार असल्याची‎ माहिती महावितरणच्या उपकार्यकारी‎ अभियंता यांनी दिली आहे.‎ िजल्ह्यात अनेक ठिकाणी िवद्युत‎ चाेरीचे प्रकार घडत असून, अनेक‎ वेळा महािवतरणकडून‎ कार्यवाहीदेखील हाेत आहे. मात्र तरीही‎ हे प्रकार थांबत नाहीत.

वीज पुरवठा‎ कायम स्वरूपी खंडित करूनही वीज‎ बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाची‎ महावितरणकडून आकस्मिक तपासणी‎ करण्यात येत असतांना बाळापूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वीज चाेरीचे प्रकार आढळून आले.‎ वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा‎ आहे.तसेच विद्युत कायद्याअंतर्गत‎ शिक्षेचेही प्रावधान या कायद्यात आहे.‎ वीज ग्राहकांनी इतर कुणालाही‎ अवैधरित्या वीज पुरवठा‎ केल्यास,त्यांच्यावरही कारवाई यापुढे‎ करण्यात येणार आहे. मार्च महिना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असल्याने महावितरणकडून वीजबिल‎ वसुलीला वेग देण्यात आला आहे.‎ वसुलीसाठी महावितरण कर्मचारी‎ ग्राहकांच्या घरापर्यंत येत आहे.अशा‎ वेळी ग्राहकांनी कर्मचाऱ्यांशी वाद न‎ घालता वीज बिल भरून सहकार्य‎ करण्याचे आवाहन महावितरण‎ बाळापूर शहर उपविभागातर्फे करण्यात‎ येत आहे.

‎ काय आढळले तपासणीत‎ महािवतरण कंपनीकडून तपासणी‎ करण्यात आली. संशयित १४१‎ ग्राहकांच्या वीज वापराची व वीज‎ मिटरची तपासणी केली करण‌्यात‎ आली. यात ६५ ग्राहकांच्या घरी वीज‎ चोरी होत असल्याचे आढळले. पैकी‎ ५७ वीज चोरीमध्ये अवैध म्हणजेच‎ मागणी केलेल्या कामासाठी वीजेचा‎ वापर न करता त्या वीजेचा वापर इतर‎ अन्य कारणासाठी करण्यात येत‎ असल्याचे आढळले.‎

२) १३ ग्राहकांनी मीटरला छेडछाड‎ करून मीटर संत करण्याचा,मीटर बंद‎ केले असल्याचे आढळले. त्यामुळे‎ अवैध कारणासाठी वीज वापरलेल्या‎ ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अंतर्गत‎ कलम १२६ नुसार,तर मीटरशी छेडछाड‎ करणाऱ्या १३ ग्राहकांवर कलम १३५‎ नुसार कारवाई करण्यात आली आहे.‎ एकुण २ लाख ९३ हजाराच्या वीज‎ चोरीवर २६ हजाराच्या दंडाची‎ आकारणी करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...