आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व:पाथर्डी सेवा सोसायटीवर महिलाराज; बहुजन विकास आघाडी पॅनलचे वर्चस्व

पाथर्डी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी येथे नुकत्याच झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जि. प. सदस्य अनंत अवचार यांच्या नेतृत्वात लढवलेल्या बहुजन विकास आघाडीचे पॅनल अविरोध निवडून आले. यानंतरच्या निवडणुकीत प्रमिला शेंगोकार यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शालिनी श्रीकृष्ण गोडबोले यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी नवनिर्वाचित संचालक विलास कुकडे, दिनेश कुकडे, पंडीत कुकडे, नरेंद्र राऊत, गोपाल इंगळे, सुरेश इंगळे, अयुबखॉ पठाण, रतनसिंग गोठवाल, संदिप काचकुटे, शरद मोहोड, श्रीकृष्ण मेसरे यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. ही निवड करण्यासाठी, प्रकाश उगले सरपंच, प्रदीप तेलगोटे, अन्ना मोहोड, पं. स. सदस्य वसंत काचकुटे, श्रीकृष्ण गोडबोले, दिवाकर कुकडे, विजय नेरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाऊसाहेब मोहोड, कमल वयले, हरिश्चंद्र राऊत, पो. पा. विजया शेंगोकार, चापानेर पो. पा. विनोद दबडघाव, धिरज शेंगोकार, अरुण वयले, नितीन कोल्हे, गणेश शेंगोकार व बहुजन विकास आघाडी पॅनलचे सर्व कार्यकर्ते हजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी बुंदे व प्रशांत पाथ्रीकर गटसचिव यांनी काम पाहले. प्रदिप तेलगोटे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळास प्रास्तविकातून शुभेच्छा दिल्या व दिनेश कुकडे, संचालक यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...