आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा लपंडाव:विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा अन्यथा‎ कायमस्वरूपीच बंद करा : गावंडे

दिग्रस‎ ‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस वीज वितरण कंपनीद्वारे‎ विद्युत पुरवठा हा मागील एक ‎महिन्यापासून ५-५ मिनिटाला बंद‎ होत असून सतत लाईन बंद राहते‎ हवा पाणी आले तर रात्रभर लाईन‎ बंद राहते. कोणीही लाईन दुरुस्ती‎ करीता येत नाही. दिग्रससह ग्रामीण ‎भागात पावसाळ्याचे व उकाड्याचे ‎दिवसात सगळीकडे अंधार आहे. पावसाळ्याचे दिवस असुन‎ नागरिकांना अंधारात फिरावे लागत‎ आहे. यामुळे जीविताला धोका‎ निर्माण झाला असल्याचे निवेदन‎ महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच‎ संघटनेच्या वतीने उपकार्यकारी‎ अभियंता प्रकाश राठोड यांना दिले‎ आहे.‎ शहरासह ग्रामीण भागातील सर्व‎ पीठ गिरण्या बंद असल्याने‎ नागरिकांवर उपासमारीची पाळी‎ आली आहे. तसेच लाईन पूर्णतः बंद‎ असल्याने सार्वजनिक पाणी पुरवठा‎ पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे‎ नागरीक पिण्याचे पाण्यापासून‎ देखिल वंचित झाले आहे. ग्रामीण‎ भागातील नागरीक अंधारात राहून‎ उकाड्यामुळे त्रस्त झाले आहे.‎

तसेच गावातील लहान मुले व‎ आजारी व्यक्तींना जीवन जगणे‎ कठीण होऊन बसले आहे. याबाबत‎ विद्युत कार्यालयाशी‎ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून‎ लाईन बंद असल्याचे वारंवार सांगून‎ कोणीही दुरुस्ती करीता येत नाही‎ फोन उचलत नाही या सर्व विजेच्या‎ लंपडावामुळे जीवनावश्यक पाणी व‎ दळण मिळणे कठीण झाले‎ असल्याने त्रस्त झाले आहे. लाईन‎ आली तर किती वेळ टिकेल याचे‎ काही सांगता येत नाही लाईन आली‎ तर केवळ ५ मिनीट चालते व लगेच‎ लाईन बंद पडते असे सतत लाईनचे‎ जाणे येणे सुरु आहे त्यामुळे सर्व‎ वेळ लाईन राहील याकरिता योग्य ती‎ तातडीची दखल घेवून लाईन दुरुस्ती‎ व्हावी किंवा लाईन संपूर्ण बंद‎ करण्यात यावी, असे निवेदन देण्यात‎ आले.‎

यावेळी पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख‎ यादव गावंडे, सरपंच संघटना‎ तालुकाध्यक्ष गंगाधर कोरडे,‎ तानाजी घुमनर, दीनदयाल चौधरी,‎ पुरुषोत्तम कुडवे, संजय काळे,‎ अशोक पवार, सुनीता भड,‎ स्वप्नील चांदावत, अभिलाषा‎ इंगोले, नितीन इंगोले, ज्योत्स्ना‎ जाधव, भूषण जाधव, मूलचंद‎ चव्हाण, अनुप राठोड, रामराव‎ भिसे, यादव पवार यांच्यासह अनेक‎ उपस्थित होते.‎ १२ तास विद्युत पुरवठा बंद‎ ‎ विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवा,‎ अन्यथा कायमचा बंद करा असा‎ सज्जड सवाल उपस्थित करून‎ लाइन गेल्या पेक्षा लाइन आल्यास‎ दुःख होते. कारण आलेली लाईन‎ अजून कधी बंद होईल हे सांगता येत‎ नाही.

शेतकऱ्यांनी सिंचनाची‎ व्यवस्था करूनही व्यवस्थित वीज‎ पुरवठा होत नाही. तसेच पाणी‎ पुरवठ्याचा यामुळे कारभार पूर्णतः‎ रेंगाळल्याने नागरिक पिण्याच्या‎ पाण्यापासून वंचित राहत आहे.‎ शहरासह ग्रामीण भागातील पीठ‎ गिरण्या विद्युत नसल्याने बंद‎ असल्याने जनसामान्यांचे हाल होत‎ आहे. वारा नसतांना सुद्धा १२ - १२‎ तास विद्युत पुरवठा बंद असतो.‎ शहरासह तालुक्यातील ७२ गावात‎ वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही‎ आणि ७२ गावांपैकी २२ गावातील‎ ट्रान्सफर जळालेल्या अवस्थेत‎ असून सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष होत‎ असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत‎ करा अन्यथा कायमचा वीज पुरवठा‎ बंद करा असा इशारा उप कार्यकारी‎ अभियंता प्रकाश राठोड यांना‎ यावेळी देण्यात आला. १० ते १५‎ दिवसात वीज समस्या दूर केल्या‎ जाईल असे आश्वासन प्रकाश‎ राठोड यांनी निवेदनकर्त्यांना दिले.‎