आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यक्तीच्या आरोग्यपूर्ण जीवनामध्ये मौखिक आरोग्याचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. मात्र अनेकजण तोंडाची स्वच्छता आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यातून विविध तक्रारी आणि आजार समोर येतात. ते उद्भवू नये, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील दंतरोगशास्त्र विभागाच्या वतीने आजच्या मौखिक आरोग्य दिवसाचे निमित्त साधत मार्गदर्शक बाबी सुचवल्या आहेत.
मौखिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी स्वच्छ मुख अभियान सुरू केले आहे. त्यामाध्यमातून जनजागृती करण्यात येते. ‘जीएमसी’मधील तज्ज्ञांच्या मते, दात, हिरड्या, जिभेच्या स्वच्छतेकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे विविध स्वरुपाचे आजार उद्भवतात. कधी या आजारांचे स्वरुप गंभीर असते. त्यामुळे मुखाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
ब्रश आणि पेस्टबाबत
- फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा ब्रश वापरा - ब्रश दातांसमोर नीट धरा व कमी अंतरात पुढे-मागे घासा. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभही घासा. - दाबाने दात घासू नका अन्यथा हिरड्यांना इजा होईल.
याकडेही द्या लक्ष
- दर तीन चे चार महिन्यांनी नवीन टूथब्रश घ्या. - नरम केसांचा ब्रश वापरा. - प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरा. - तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युइंगम चघळा. - स्नायूंना व्यायाम घडवण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा. - मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा. - जीभ स्वच्छ आहे, याची खात्री करण्यासाठी टंग क्लीनर वापरा.
तोंडाची स्वच्छता महत्वाची
दात, हिरड्या, जीभ अर्थात मुखाचे आरोग्य एकूण आरोग्यात महत्त्वाचे असते त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखली जाणे आवश्यक आहे.त्यासाठी नियमित दोनवेळा ब्रशकरण्याची सवय लाऊन घ्यावी.दाताचे दुखणे, जीभ, हिरड्यांच्या तक्रारी किंवा दुखणे अंगावर न काढता तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास साध्या तक्रारीही गंभीर होतात. - प्रा. डॉ. दिनेश नैताम, विभागप्रमुख, दंतरोगशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.