आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:पीकेव्हीतील ‘एसटीपी’ची देखभाल-दुरुस्ती दोन महिन्यानंतर मनपाकडे ; अद्याप प्रशिक्षणही दिले नाही

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूमिगत गटार योजनेतील पीकेव्ही परिसरातील ७ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी (मलजलशुद्धीकरण केंद्र) ची देखभाल दुरुस्ती दोन महिन्यानंतर मनपाला करावी लागणार आहे. कंपनीने मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले नसून, तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही वानवा आहे. त्यामुळे देखभाल- दुरुस्ती मनपा करणार की त्यावर लाखो रुपये खर्च करणार? ही बाब काही महिन्यात स्पष्ट होईल. अमृत योजने अंतर्गत ६६.३८ कोटी खर्च करुन भूमिगत गटार योजना सुरु केली. या योजनेत दोन ठिकाणी मलजलशुद्धीकरण केंद्र उभारले. शिलोडा येथे नदीपात्रात टाकलेल्या मलजलवाहिनीतून तर पीकेव्हीतील केंद्रात उमरी परिसरातील नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. पीकेव्ही येथील एसटीपीत दररोज नाल्यातील ७० लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. कंपनीशी झालेल्या करारनाम्यानुसार प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित झाल्यानंतर तीन महिने प्रकल्पाची देखभाल- दुरुस्ती कंपनी करणार आहे. तर त्यानंतर मनपाला करावी लागणार आहे. कंपनीला मनपा कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणही द्यावे लागणार आहे. मनपात तांत्रिक कर्मचाऱ्यांची वानवा असताना उपलब्ध तांत्रिक कर्मचाऱ्यांनाच हे प्रशिक्षण घ्यावे लागणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे मनपा देखभाल- दुरुस्ती कंपनीला देणार की स्वत: करणार? ही बाब येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

महापालिकेच्या खर्चात वाढ होणार मनपाने देखभाल दुरुस्तीचे काम कंपनीला दिल्यास त्याचा मोबदला तसेच केंद्र चालवताना जळणाऱ्या विजेचे महिन्याकाठीचे लाखो रुपयांचे देयक द्यावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात वाढ होणार आहे.

केंद्रासाठी असा लागेल तांत्रिक कर्मचारी वर्ग नियंत्रण अभियंता १ पंप चालक ४ गाळणी चालक ४ जलसेवक ४ स्कॉडा ऑटोमेशन तज्ज्ञ १ चौकीदार ३

अशी केली जाते सांडपाण्यावर प्रक्रिया Âनाला आणि नदी किनारी टाकलेल्या पाइपमध्ये नाल्यातील पाणी बंधाऱ्यातील जाळीमार्फत गाळून घेतले जाते. जेणे करुन यात दगड,धोंडे आदी मोठ्या वस्तू पाइपमध्ये जावू नयेत. Âगाळून आलेले पाणी रिसिव्हिंग चेंबरमध्ये सोडले जाते. चेंबरमध्ये आलेल्या सांडपाण्यातून पुन्हा चाळणी लावून कचरा बाहेर काढला जातो. Âरिसिव्हिंग चेंबर मधील सांडपाणी प्रायमरी युनिटमध्ये सोडले जाते. या ठिकाणी गाळण करुन प्रथम ६ ते ८ एमएम आकाराचे दगड त्यानंतर पुन्हा गाळण करुन २ ते ५ एमएम आकाराचे दगड बाजूला काढले जातात. Âचार वेळा गाळण झालेले सांडपाणी मोठ्या टाक्यात सोडले जाते. टाक्यात आलेल्या पाण्याला १५० एचपी क्षमतेच्या दोन पंपाने टाक्याच्या आतून हवा सोडली जाते. Â या हवेमुळे बॅक्टेरीया वर येतात. तर पाणी क्लोरीनेशन टँकमध्ये आणले जाते. Â हे पाणी पिण्याकरीता सोडून अन्य कामाकरीता वापरता येते.

बातम्या आणखी आहेत...