आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसमुदाय उपस्थिती:शहराच्या वाहतूक मार्गात मोठे बदल

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात येते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थिती लावतो. त्यानिमित्त प्रशासनाने वाहनधारकांची व येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घेत वाहतुकीचे नियोजन केले आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन चौकातून मिरवणुकीला सुरूवात होणार आहे.

ही मिरवणूक रेल्वे ओव्हर ब्रीज, शिवाजी पार्क, अकोट स्टॅण्ड, मामा बेकरी, कोतवाली चौक, गांधी चौक, धिंग्रा चौक, टॉवर चौक या मार्गे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सायंकाळी ७ वाजता पोहाेचणार आहे. दरम्यान वाहतुकीला अडथळा होवू नये व रहदारी नियंत्रणाच्या दृष्टीने मिरवणूक व सभेच्या मार्गावरील अकोट अकोला राज्य मार्ग व पारस फाटा-बाळापूर मार्गावरील वाहतूक गुरूवारी सकाळी ६ वाजता पासून ते शुक्रवारचे सकाळी ६ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...