आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:मूल होत नाही म्हणून पत्नीला विष पाजले; पतीला पाच वर्षांचा कारावास

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पत्नीला मूल होत नाही म्हणून पतीने पत्नीला विष पाजले, असा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. बुधवारी या खटल्याचा निकाल लागून आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. राहूल रामराव पवार असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोप असा होता की, बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी येथील राहूल पवार आणि यवतमाळ जिल्ह्यातील कानडी येथील सुनंदा यांचा विवाह २००७ मध्ये झाला होता. लग्नाला पाच वर्षे उलटली मात्र सुनंदाला मूल होत नाही. म्हणून तिचा पती व सासू, नणंद, इतर नातेवाइक तिचा शारिरिक,मानसीक छळ करीत होते.

३ मार्च २०१३ रोजी पतीसह सर्व आरोपी घरी असताना मूल होत नाही म्हणून फारकत दे असे म्हणून सुनंदा सोबत वाद घातला. घरातच पती राहूलने तिला मारहाण केली व विष पाजण्याचा जबरी प्रयत्न केला. सुनंदा चक्कर येऊन पडल्यानंतर नातेवाइकांनी तिला रुग्णालयात नेले. सात दिवसांनतर ती शुद्धीवर आली होती. शुद्धीवर आल्यानंतर उपरोक्त बयाण तिने पोलिसांना दिले.ए त्याआधारे पोलिसांनी आरोपी पती राहूल, आई शारदा, बहिण शालू, रंजन रामराव राठोड, देवानंद रामराव पवार, सुरेश लाला राठोड, राहूल गुलाबराव राठोड,सविता राहूल राठोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, व ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता व आरोपी पतीला अटक केली होती.

पिंजर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सरकार पक्ष व आरोपी पक्षाची बाजू ऐकून पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.के. भालेराव यांच्या न्यायालयाने आरोपी पती राहूल याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला तर आरोपीची आई, बहिण व इतर नातेवाइकांविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष सुटका केली. आरोपीतर्फे अॅड. आशिष देशमुख, अॅड. संतोष राऊत, अॅड. शेषराव गव्हाळे व समीर ढोले यांनी बाजू मांडली.

नंतर मूलही झाले

दोघांमधील वाद नंतर निवळले होते. या दोघांना २०१७ मध्ये मूल झाले. त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. मात्र खटला पुराव्यावर आला व आरोपीचे अटक वारंट काढण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केली, दरम्यान पत्नीने न्यायालयात आधी जे बयाण दिले होते. तेच कायम ठेवल्याने आरोपी पतीला शिक्षेपर्यंत पोहोचण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...