आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:माना येथे जि. प. विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

मूर्तिजापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद विद्यालय माना येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन गिरी जिल्हा परिषद विद्यालय माना होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मंगेश वानखडे ग्रामपंचायत माना आणि सविताताई खंडारे माजी उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हाराअर्पण करून कार्यक्रमाचे सुरुवात झाली.

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विद्यालयांत स्वयंशासन उपक्रम राबवला. त्यात वर्ग ८ ते दहावी १० विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासन सांभाळले. मुख्याध्यापिका म्हणून कुमारी मयुरी कोकने हिने पदभार सांभाळला. स्वयंशासनातील शिक्षक विद्यार्थ्यांना पेन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार कला. याप्रसंगी मंगेश वानखडे यांनी समृद्धी चिमणकर या विद्यार्थिनिस उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल १०१ रुपयाचे बक्षीस दिले. मंगेश वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे संचालन अपर्णा चक्रे आणि आभार प्रदर्शन गायत्री खांडेकर या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी गोकणे, झोडपे, अणुशक्ती वानखड, अंभोरे, विनोद देशमुख आणि वर्ग ५ ते १० चे विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...