आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश:उत्सवातून मंडळाचा सामाजिक एकात्मतेचा संदेश

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्सवात सर्वत्र चैतन्य असते. उत्सवांमुळे सामाजिक एकोपा वाढीस लागतो. सार्वजनिक उत्सवाचे हेच खरे फलित समजले जाते. श्री तेलीपुरा गणेश उत्सव मंडळ याचे मूर्तमिंत उदाहरण आहे. या मंडळाची मूर्ती हिंदू बांधव मांडतात, तर मुस्लमि समाजबांधव सजावट कार्य करतात.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेलीपुऱ्यात रामलिला झाकी व्हायच्या. याच समूहाकडून १९४० मध्ये राठोड पंच बंगला येथे गणेश उत्सवाची सुरुवात झाली. तेव्हा गणेश स्थापना घरगुरीस्तरावर होती. तरी उत्सवात तेलीपुऱ्यातील सर्व बांधव सहभागी व्हायचे. १० वर्षानंतर श्री तेलीपुरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून उत्सवाला स्वरूप प्रदान झाले. तत्काळात मंडळाचे अध्यक्ष महादेव पटवी यांनी नवीन संकल्पना मांडल्या. त्यांना काशीराम चोपडे, गोपाल चोपडे, इचे, भिकाजी बोराखडे, चंद्रकांत भगत यांची उत्तम साथ लाभली.

सुरुवातीपासून श्री तेलीपुरा गणेश उत्सवाचे वैशिष्ट देखावे होते. सीता स्वयंवर, भगवान विष्णू नरसिंह अवतार, अर्जून लक्षभेद, संत गोरा कुंभार, ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची पांडुरंग भक्ती, साईबाब अवतार असे देखावे बघण्यासाठी गर्दी व्हायची. जवळपास ३० वर्ष उत्कृष्ट देखाव्यात श्री तेलीपुरा गणेश उत्सव मंडळ अव्वल होते.

श्री तेलीपुरा मंडळाचा रक्तदात्यांचा स्वतंत्र ग्रुप
मंडळाकडून अन्नदान, रक्तदान, आरोग्य शिबिर असे उपक्रम राबवले जातात. मुख्य म्हणजे मंडळाच्या सदस्यांचा एक रक्तदानाचा ग्रुप आहे. कुणालाही रक्तांची गरज पडल्यास सदस्य एका हाकेवर हजर असतात. ४२ सक्रिय रक्तदाते ग्रुपमध्ये आहेत.

उत्सवात सर्व धर्मातील भाविकांचा सहभाग
१९९२ मध्ये अकोल्यात वाद झाला होता. या वेळी तेलीपुरा येथील हिंदू-मुस्लमि समाजबांधव एकत्र आले व परिस्थिती सांभाळली. यामुळे मोठी जीवितहानी टळली. तेलीपुऱ्यात पूर्वीपासून हिंदू-मुस्लमि समाजाची एकता बघावयास मिळते. हेच एक्य गणेश उत्सवातही प्रकर्षाने दिसून येते. श्री तेलीपुरा गणेश मंडळाची मूर्ती मंडळाकडून स्थापित करण्यात येते. तर उत्सवाची संपूर्ण तयारी मुस्लमि समाज बांधव करतात. आरती, पूजन, प्रसाद वितरणात सर्व जाती, धर्माचे लोक मोठ्या संख्येत सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...