आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांशिवाय पुरूष अपूर्ण असतो. स्रिसन्मान हा केवळ महिला दिनी असू नये तर तो वर्षभर राहिला पाहिजे, असे प्रतिपादन योगगुरू मनोहरराव इंगळे केले. शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने नेहरू पार्क मध्ये महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तर रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. तर नियमितपणे योग करणाऱ्या महिलांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अरूणा धुमाळे , ज्योती सावरकर यांनी समयोचीत आपल्या भावना विशद केल्यात. कार्यक्रम यशस्वितेसाठी जसवंतसिंग मल्ली, कुंडलवार, पुरुषोत्तम गुप्ता, शिवतेज इंगळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अनुराधा इंगळे ,वंदना तायडे, शालीनी राठोड,जोती वानखडे, सरला कागलीवाल, मंदा कडू, सोनाली तेलगोटे,निर्मला काळे, वैशाली रावणकर, अरूणा पाटील, मंगला भिवरकर,खंडारे, माया जाधव, बलोदे आदि महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.