आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपा प्रभारी आयुक्तांना घ्यावा लागेल निर्णय:मानसेवींना एक की सहा महिन्याच्या कामाचे आदेश मिळणार?

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
26 डिसेंबर रोजी कामाचे आदेश येणार संपुष्टात - Divya Marathi
26 डिसेंबर रोजी कामाचे आदेश येणार संपुष्टात

महापालिकेत कार्यरत मानसेवी कर्मचाऱ्यांचे 26 डिसेंबर रोजी कामाचे आदेश संपुष्टात येत आहेत. तुर्तास आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रभारी आयुक्त मानसेवी कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या कामाचे आदेश देतात की सहा महिन्याचे? ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापालिकेत विविध तांत्रिक पदांवर मानसेवी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या 113 आहे. या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यानी दोन दिवसाचा खंड देवून कामाचे आदेश दिले जातात. तुर्तास महापालिकेत कार्यकारीणी नसल्याने प्रशासक म्हणून कविता द्विवेदी यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे आदेश संपुष्टात आल्या नंतर त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुर केला. मात्र कामाचे आदेश तत्काळ दिले नाहीत. त्यामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे आदेश मिळणार की नाही? अशी भावना निर्माण झाली होती. मानसेवी कर्मचारी 15 ते 22 वर्षापासून कार्यरत असल्याने अनेकांचे नोकरीचे वय निघून गेले आहे. काहींनी 45 शी तर काहींनी 50 शी पार केली आहे. यामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच या मानसेवी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा घाटही घालण्यात आला होता. काही राजकीय पुढाऱ्यांनी यात मध्यस्थी केल्या नंतर आयुक्तांनी याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागीतले.

अद्याप शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन आले नाही. या दरम्यान आयुक्त कविता द्विवेदी यांनी केवळ एक महिन्याच्या कामाचे आदेश दिले. हे आदेश 26 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहेत. या दरम्यान आयुक्त तथा प्रशासक पदाचा प्रभार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडे आहे. त्यामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना द्यावे लागणार आहेत. निमा अरोरा एक महिन्याच्या कामाचे आदेश देतात की सहा महिन्याचे? याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...