आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी देयक वाटपाचे काम सुरू‎:अनेक नळधारकांना तीन ते चार वर्षांपासून‎ मनपाकडून पाणीपट्टी देयके मिळालीच नाहीत‎‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम झोनमध्ये पाणीपट्टी देयक‎ वाटपाचे काम सुरू करण्यात आले‎ आहे. दरम्यान शेकडो नळधारकांना‎ तीन ते चार वर्षांपासून पाणीपट्टी देयके‎ न मिळाल्याने नागरिकांना हजारो‎ रुपयांचे देयक मिळणार आहे.‎ अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी‎ रुपये खर्च करुन पाणीपुरवठा‎ योजनेचे सबलीकरण करण्यात आले.‎ यात नळांना मीटर लावण्याची‎ मोहीमही सुरू करण्यात आली.‎ नळांना मीटर लावल्यानंतर युनिट‎ प्रमाणे पाणीपट्टीचे देयक देण्याचे‎ निश्चित करण्यात आले.

मात्र प्रत्येक‎ नळधारकाकडून होणारी पाण्याची‎ उचल आणि प्रति हजार लिटर मागे‎ घेतले जाणारे १२ रुपये या बाबी‎ लक्षात घेवून महापालिकेने मीटर‎ लावणाऱ्या नळधारकाला प्रतिमहिना‎ १२० रुपये यानुसार पाणीपट्टी देयक‎ देण्याचा निर्णय घेतला. मीटर रिडिंग‎ करुन त्याचे देयक तयार करण्याचे‎ काम कंत्राटदाराला तर देयक‎ पोहाेचवण्याचे काम कर्मचाऱ्यांना‎ देण्यात आले. मधल्या काळात‎ कंत्राटदाराला त्याचे थकीत देयक न‎ दिल्याने देयक तयार करण्याचे काम‎ ठप्प झाले होते. त्याचा विपरित‎ परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झाला.‎ तसेच अनेक भागात पाणीपट्टी देयक‎ पोहाेचले नाही. यामुळे नागरिक त्रस्त‎ झाले असून, रखडलेली पाणीपट्टीची‎ देयके त्वरित वितरीत करावी,अशी‎ मागणी नागरिकांनी केली आहे.‎