आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक‎ प्रचंड वाढली:शनिवारपर्यंत तूर घेण्यास‎ बाजार समितीत प्रतिबंध‎‎

अकाेला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला कृषी उत्पन्न बाजार‎ समितीमध्ये शेतमालाची आवक‎ प्रचंड वाढली असून, शनिवारपर्यंत‎ तूर आणण्यासाठी ब्रेक लावण्यात‎ आला आहे.‎ यंदा काही ठिकाणी तुरीचे उत्पादन‎ वाढले असून, शेतकरी तूर‎ िवक्रीसाठी बाजार समितीमध्ये‎ आणत आहेत.

अडते, खरेदीदार व‎ शेतकरीऱ्यांना तूर हर्राशी‎ विक्रीकरिता आलेल्या दिवशी होत‎ नसल्याचे िदसून आले. तसेच तूर‎ शेतमाल उतरवण्यासाठी जागा‎ उपलब्ध होत नसल्याने शेतकरी व‎ वाहनधारकांना दिवसभर वाहने उभी‎ करावी लागतात. त्यामुळे‎ शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत असून,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्यांना त्रासही सहन करावा लागत‎ आहे. बाजार समितीमध्ये तूर‎ शेतमाल प्रलंबित राहत असल्याने तूर‎ शेतमालाची आवक ४ मार्च २०२३‎ पर्यंत स्वीकारण्यात येणार नाही.‎

रस्त्यावरही ठेवली पाेती‎
अकाेला बाजार समितीच्या‎ यार्डासही हरभरा व अन्य‎ शेतमालाचे पाेते ठेवण्यात आले‎ आहेत. अनेकांनी वाहनांमध्येही‎ शेतमाल भरूनही ठेवले आहे.‎ तसेच मुख्यद्वाराकडून आतमध्ये‎ जाणाऱ्या रस्त्यावरही पाेती ठेवण्यात‎ आली आहेत. त्यामुळे एकाबाजूचा‎ काही रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.‎ परिसरातच शेतमाल स्वच्छ‎ करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...