आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना निर्बंधमुक्ती:लग्नकार्याचा शुभारंभ 24 नोव्हेंबरपासून ; लग्नसराई धुमधडाक्यात हाेणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. शनिवार ५ नोव्हेंबरपासून तुळशीविवाहास प्रारंभ होत आहे. तुलशीविवाहानंतर लग्नकार्याला सुरुवात होते. यानुसार यंदा गुरुवार २४ नोव्हेंबरपासून लग्नसराईला प्रारंभ होत आहे. याशिवाय लग्न, माैंज, गृहप्रवेश यासाठी नागरिकांना शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा असते. या कार्यांनाही आता सुरुवात होणार आहे. २०२२ मध्ये एकूण १० शुभमुहूर्त आहेत. काही महनि्यांपासून शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा असणारी मंडळी गुरुवार २४ नोव्हेंबरला लग्नकार्याचा बार उडवण्यासाठी सज्ज आहेत. दोन वर्षानंतर यंदा लग्नकार्य पूर्णत: कोरोना निर्बंधमुक्त असणार आहे. त्यामुळे लग्नसोहळे धुमधडक्यात साजरे होणार आहेत.

यासाठी मंगलकार्यालय, केटरिंग, बँडबाजा, डेकोरेशनसाठी बुकिंग सुरू झाले आहे. अनेक कार्यालयातील पुढील दोन महनि्यांच्या तारखा बुक झाल्या आहेत. लग्नकार्यामुळे फुलांच्या मार्केटलाही चांगले दिवस येणार आहेत. सराफा मार्केटमध्ये आतापासून गर्दी दिसून येत आहे. कपडा मार्केटमध्येही हिच स्थिती आहे. दिवाळी आणि येणारी लग्नसाराई यामुळे दुकानांमध्ये प्रचंड उलाढाल होत आहे. याशिवाय लहान-मोठ्या लग्नकार्यासंबंधित सर्वच दुकानांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये वर्दळ वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...