आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 6 महिन्यातच पतीचा खरा चेहरा दिसला:जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्याच्या बोरगांव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील यावलखेड येथे 19 ऑगस्ट रोजी घडली आहे. प्रकरणात कुटूंबियांनी 22 ऑगस्ट रोजी तक्रार दिली. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी कुटूंबियांनी अकोला पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सासरच्यांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सासरकडील सर्व मंडळी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सासरच्यांकडून होता त्रास

दरम्यान दर्शना प्रशांत पवार (वय 24), रा. बालाजी नगर, कात्रज, पुणे असे मृतक विवाहितेचे नाव आहे. मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार दिली की, दर्शना हिचा विवाह 6 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशांत रामकृष्ण पवार गाव गायगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा. ह.मु. बालाजी नगर, कात्रज, पुणे. याच्याशी झाला. प्रशांत एका खासगी कंपनीत पुण्यात कामाला असतो. तर सासरचेही पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. दरम्यान, माहेरकडून दर्शनाला सोने-चांदीचे दागिनेसह 4 लाख 50 हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या होत्या. नंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांत त्याचे वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते. काही दिवस चांगले गेले, नंतर मार्च 2022 मध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन पती- सासरच्यांनी दर्शनाशी वाद घालायला सुरुवात केली.

पैशाची वारंवार मागणी

"तुझ्या आई-वडिलांनी लग्नांमध्ये पाहुण्यांची काही सोय केली नाही, हलक्या दर्जाच्या वस्तू भेट दिल्या, तू खेळपट मुलगी आहे, असे वारंवार टोमणे द्यायचे. मारहाण करायचे, असं नेहमी दर्शना फोनवर सांगायची, असंही तक्रारीत नमूद आहे. यासोबतचं तिला माहेरकडून 1 लाख 50 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर माहेरकडच्यांनी तिला घेऊन अकोल्याच्या यावलखेडमध्ये घरी आणले. तेव्हा तिने झालेला पूर्ण त्रास माहेरच्यांना सांगितला.

सासरच्यांवर गुन्हा दाखल

प्रशांत पवार व सासरच्यांनी नेहमी दर्शनाला शारिरिक, छळवणूक तसेच तिला घरून पैसे आणण्यासाठी नेहमी तगादा लावला जायचा.तिने तिच्या माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र माहेरच्यांनी आज ना उदया सासरचे नांदवतील अशी समजूत दिली. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला. दर्शना माहेरी असताना तिला फोनद्वारे तुला वागवत नाही तसेच प्रशांत दुसरे लग्न करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळेच दर्शनाने आत्महत्याचं पाऊल उचललं, असा आरोप दर्शनाच्या नातेवाईकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...