आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात आगडोंब:बार्शीटाकळीत मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, दुचाकीसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी तेलीपुरा येथील एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला शनिवारी अचानक आग लागल्याने दुचाकी सहित लाखो रुपयांचे मंडप डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शहरामध्ये श्याम वाघमारे मंडप डेकोरेशनला शनिवारच्या पहाटे आग लागली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. दरम्यान पोलिस गौपनीय विभागाचे किशोर पिंजरकर, शरद सांगळे यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वीच दुकानातील सर्व सामन पूर्णपणे आगीत भस्म झाले होते. मुख्य म्हणजे गोडाऊनमध्ये विज पूरवठा नाही. त्यामुळे आग कशी लागली? हा संशोधनाचा विषय आहे.

या घटनेमध्ये कुटुंबाचे रोजीरोटीचे साधन हिसकावल्या गेले. लाखोंचे हे नुकसान भरून काढणे कठीण असल्याचे, श्याम टेन्ट हाऊस डेकोरेशनचे संचालक गणेश श्याम वाघमारे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरून काढण्यासाठी मदत करण्याची विनंती त्यांनी केली आहे. आग विझविण्यासाठी अनंत केदारे, भारत बोबडे, शिवा नंदखोडके, लक्ष्मण वाघमारे, शुभम अग्रवाल, सौरभ अग्रवाल यांनी सहकार्य केले.

आगींच्या घटनांमध्ये वाढ

काही दिवसांपूर्वीच बार्शीटाकळी येथील स्टेट बँकेच्या इमारतीला आग लागली. यामध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावरील पंकज बिअरबार जळून खाक झाले. यापूर्वी आशीच्या घटना झाल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्क राहून, योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...