आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Mata Nagar Residents March On Municipal Corporation; Give A Crib Before Demolishing The House; Today's Action Has Been Stopped, Action Will Be Taken After Survey

मातानगरकरांचा महापालिकेवर मोर्चा:घर पाडण्यापूर्वी घरकुल देण्याची नागरिकांची मागणी; तूर्तास कारवाई थांबवली

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका टेम्पल गार्डन शाळा परिसरात बांधण्यात येणाऱ्या बेघर निवाऱ्यासाठी आमचे घर पाडण्यापूर्वी आम्हाला घरकुल द्या, अशी मागणी करीत मातानगरमधील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. त्यामुळे आजची कारवाई थांबविण्यात आली. आता सर्वे करून नेमक्या किती लोकांना घरकुले मिळाली, याची माहिती घेतल्यानंतर कच्ची घरे पाडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

रामदास पेठ पोलिस ठाण्या लगत माता नगर आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून शेकडो कुटुंबे राहतात. या ठिकाणी घरकुलांचे काम करता यावे, यासाठी माता नगर भागातील रहिवाशांना माता नगर समोरील महापालिकेच्या टेम्पल गार्डन शाळेलगतची रिकामा जागा तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेने दिली होती. आता या जागेत महापालिकेला बेघर निवारा बांधावयाचा आहे. त्यासाठी महापालिकेला ही जागा रिकामी करुन हवी आहे. महापालिकेने या नागरिकांना कोणतीही पूर्व सुचना न देता थेट मंगळवारी सायंकाळी ही जागा रिकामी करण्याचे आदेश या नागरिकांना दिले. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. एकीकडे घरकुल मिळालेले नसताना कच्चे घरही जाणार असल्याने आता आम्ही राहावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला.

या अनुषंगानेच माता नगर भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेला. या भागातील नागरिकांनी एक निवेदनही आयुक्तांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, 2009 मध्ये घरकुलाचे काम करण्यासाठी माता नगरातील 162 लाभार्थ्यांना समोरची जागा देण्यात आली. मात्र 162 कुटुंबांपैकी केवळ 40 जणांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कच्चे घर पाडल्या नंतर आम्ही जगावे कसे? त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा त्यानंतर ही कारवाई करावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दरम्यान नेमक्या किती कुटुंबाची नावे या घरकुल योजनेत होती. त्यापैकी किती जणांना घरकुल देण्यात आले? याबाबत सर्वे करुन संपूर्ण माहिती प्राप्त झाल्या नंतर या भागातील कच्ची घरे पाडण्याची कारवाई करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. तुर्तास ही कारवाई टळली असली तरी येत्या काही दिवसात ही कारवाई होवू शकते.

महापालिका निवडणुका आणि कारवाई

माता नगर मधील कच्ची घरे पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर विविध पक्षांचे इच्छुक या नागरिकांच्या मदतीला धावून आले. निवडणुकीच्या आदी ही घरे पाडल्या गेल्यास याचा फटका निवडणुकीत होईल. यासाठी अनेकांनी प्रशासनासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला.

बातम्या आणखी आहेत...