आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माउली’च्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित; अ गटात हर्षा शेलकर तर ब गटात लता जाधव प्रथम, मान्यवरांनी केले कौतुक

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माऊली फांउडेशनतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचा निकाल मान्यवराच्या उपस्थितीत मनुताई कन्या विदयालयात घोषित करण्यात आला आहे. फेबुवारी महिन्यात अ गटात कोरोना कालावधी व अध्यापन कार्य व ब गटात दैनदिन जीवनमान उंचावण्यासाठी कार्य या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही गटातील परीक्षण संचालक सैय्यद रब्बानी, संचालक श्रींकात जोशी यांच्या मार्गदर्शनात तज्ञांनी केले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम शिंदे, प्रा. अनिल शेलकर व्यासपिठावर उपस्थित होते.

प्रास्ताविकातुन फांउडेशनच्या कार्याचा आलेख अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडेकर यांनी मांडला. फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक, नैसर्गिक कार्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने कार्यन्वित असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या काळात नियमित कार्य कशा स्वरुपात होऊ शकते यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. निंबध स्पर्धेचा निकाल संचालिका मनिषा शेजोळे यांनी घोषित केला. अ गटात प्रथम हर्षाताई शेलकर, द्वितीय निलीमा कथले, तृतीय सोनाली निचळ तर प्रोत्साहनपर बक्षीसे संध्याताई पांडे, नीलेश कवडे, मेघाताई बुलबुले यांना जाहीर झाली. ब गटात प्रथम लताताई जाधव, द्वितीय रंजना पुनवटकर, तृतीय डॉ. वर्षाताई देशपांडे, प्रोत्साहनपर बक्षीस रजनी उज्जेनकर यांना जाहीर झाले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व एक हजार ते ३०० रुपयांपर्यंतचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विजेत्यांपैकी लता जाधव, हर्षा शेलकर, संध्या पांडे, श्रध्दा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. अनिल शेलकर म्हणाले, महिला दिनी महिलांना गौरविणे ही खरी कृतज्ञता आहे. पुरूषोत्तम शिंदे म्हणाले, पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी सामाजिक कार्य कृतज्ञता म्हणून करावे. महिलांनी आपले कार्य जबाबदारीने व गुणवत्तेने पूर्ण केले तर ते संस्कारक्षम होईल. या कार्यातून आनंद मिळेल सोबत व्यक्तिमत्वाचा विकास होईल, असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऐश्वर्या धारस्कर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रिती मारशेटवार यांनी केले. आभार फाऊंडेशनचे सचिव अशोक पारधी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...