आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षात पश्चिम विदर्भ सुजलाम् सुफलाम्:सर्वाधिक 95.50 टक्के जलसाठा उपलब्ध, हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भात सहा वर्षात प्रथमच सर्वाधित जलसाठा उपलब्ध झाला आहे. आता पाऊस पूर्णपणे थांबल्याने या साठ्यात वाढ होण्याची शक्यता नाही. आता पर्यंत झालेल्या पावसामुळे साठवण क्षमतेच्या ९५.५९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

पश्चिम विदर्भात अमरावती जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम तर ४६ लघु असे एकुण ५४ जल प्रकल्प आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, ६ मध्यम, ९५ लघु असे एकुम १०४, अकोला जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि २४ लघु असे एकुण ३० प्रकल्प आहेत. वाशिम जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसून तीन मध्यम आणि ७४ लघु असे एकुम ७७ जल प्रकल्प आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम आणि ३७ लघु असे एकुण ४७ जल प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे ३१०८.७७ दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झ्ाली आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे प्रकल्पात २९७१.५८ दशलक्ष घनमिटर (९५.५९ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. आता पावसाची शक्यता नसल्याने या जलसाठ्यात वाढ होणार नाही. मात्र ९५.५९ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने या पाचही जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान काही प्रमाणात भरुन निघण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी मागील सहा वर्षात सर्वाधिक जलसाठा उपलब्ध झाला आहे.

६ वर्षातील ५ नोव्हेंबर रोजीचा जलसाठा

  • २०१७ - १५२३.७४ दलघमी
  • २०१८- १७५६.६९ दलघमी
  • २०१९ - २५१९.९६ दलघमी
  • २०२० - २७३८.३६ दलघमी
  • २०२१ - २८६४.८५ दलघमी
  • २०२२ - २९७१.५८ दलघमी

प्रकल्पातील जलसाठा असा

  1. ९ मोठे प्रकल्प - १३९९.५१ दलघमी - ९९.४० टक्के
  2. २७ मध्यम प्रकल्प - ६८८.४५ दलघमी - ८९.९९ टक्के
  3. २७५ लघु प्रकल्प - ८९१.६२ दलघमी - ९४.४७ टक्के

प्रकल्पातून विसर्ग सुरुच

मोठ्या नऊ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पातून तर २७ मध्यम प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...