आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवर-रुबेला लसीकरण मोहिम:महानगर पालिकेच्या वतीने गुरुवारपासून राबवणार, मोहिमेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाने दिलेल्या आदेशा नुसार मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये गुरुवार दि. १५ डिसेंबर पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेस सुरूवात होणार आहे. यामध्‍ये पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर २०२२ पर्यंत आणि दुसरा टप्‍पा १५ ते २५ जानेवारी २०२३ दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे.

शासना कडून प्राप्‍त मार्गदर्शक सुचनेनुसार मनपा आयुक्‍त यांच्‍याव्‍दारे त्‍यांच्‍या दालनात घेण्‍यात आलेल्‍या बैठकीमध्‍ये मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभाग आणि डब्‍ल्‍यू एच ओ चे डॉ.ठोसर सहभागी झाले होते. या बैठकीत मनपा क्षेत्रातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एम.आर. लसीकरण १०० टक्‍के पुर्ण करून घेण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या कृती आरखड्यावर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगाटातील बाळांना सर्व पालकांनी या मोहीमेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घेऊन आपल्‍या बाळांना एम.आर.लसीकरण करवून गोवर आणि रुबेला या आजारापासून संरक्षण करुन घेण्‍याचे तसेच या मोहीमेमध्‍ये व्‍हीटामिन-ए ची सुध्‍दा व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून ज्‍या बालकांना व्‍हीटामिन-ए ची मात्रा घेवून ६ महिने उलटले असतील त्‍यांना ही लस सुध्‍दा घ्यावी,असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. या मोहीमे दरम्‍यान अकोला मनपाचे १० नागरी आरोग्‍य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय, अकोला येथे सदर लसी मोफत उपलब्‍ध आहे.

या अनुषंगाने झालेल्या बैठकीत मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अनुप चौधरी, बालमाता संगोपन अधिकारी डॉ.विजय चव्‍हाण, वैद्यकीय अधिकारी नितिन गायकवाड, डॉ.मनीषा बोरेकर, डॉ.मोहम्‍मद मुसलोद्दीन, डॉ.अनम कौसर, डॉ.योगेश कराळे, डॉ.वासिक अली, डॉ.छाया उगले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...