आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:37 नियमित, 8 अतिरिक्त सत्रांत गोवरचे लसीकरण

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २५ डिसेंबरपर्यंत लहान मुलांसाठी गोवरविरुद्ध लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला गुरुवारी प्रारंभ झाला. यात जिल्ह्यात १४६ बालकांना पहिला, १४८ बालकांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात ३७ नियमित आणि ८ अतिरिक्त सत्रांमध्ये लसीकरण केल्याची माहिती जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर यांनी दिली.

दुसरा टप्पा १५ ते २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हून अधिक गोवर बाधित रुग्ण आढळून गेले आहेत. त्यामुळे ज्या बालकांची लस घेणे बाकी आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे.

३८४ बालकांना व्हिटॅमिन ए चा डोस
जिल्ह्यात गुरुवारी ३८४ बालकांना व्हिटॅमिन एचा डोस देण्यात आला. बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाला तरी या डोसमुळे गंभीर लक्षणे निर्माण होणार नाहीत. त्यामुळे व्हिटॅमिन एचा डोस हा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...