आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु प्रकल्प:वानसह मध्यम प्रकल्प जैसे-थेट; सात लघु प्रकल्प मात्र अद्यापही कोरडे

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ०.४४ दलघमीने वाढ

जिल्ह्यात २७ जुन रोजी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ०.४४ दशलक्ष घनमिटरने वाढ झाली आहे. तर सात लघु प्रकल्प मात्र अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम तसेच २३ लघु प्रकल्प आहेत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध शहराची तहान भागते तसेच सिंचनालाही पाणी मिळते. यावर्षी २६ जुन पर्यंत दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जल प्रकल्पातील साठ्यात वाढ झाली नाही. परंतु २७ जुन रोजी जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला तसेच काटेपूर्णा पाणलोट क्षेत्रात २७ जुन रोजी ४०६ मिमी पावसाची नोंद झाली. तर वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाच्या साठ्यात वाढ झाली. २७ जुन रोजी काटेपूर्णा प्रकल्पात २५.१६ दलघमी साठा होता. तो आज २५.६० दलघमी झाला आहे. परंतु अन्य मोठ्या तसेच मध्यम प्रकल्पात वाढ झाली नाही.

दरम्यान शहापूर लघु पाटबंधारे, जनुना, झोडगा, मोऱ्हळ, हातोला, कसुरा, तामशी हे सात प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. या लघु प्रकल्पाच्या परिसरात पाऊस झालेला नाही.

वाशीम जिल्ह्यात पाऊस झाल्यावर काटेपुर्णात होते वाढ
काटेपूर्णा नदीचा उगम वाशीम जिल्ह्यात काटा गावात आहेत. त्यामुळे वाशीम, मेडशी, मालेगाव आदी भागात जोरदार पाऊस झाली की नाले दुथडी भरुन वाहतात. ते काटेपूर्णा नदीला येवून मिळतात. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते. तर सातपुडा परिसरात पाऊस झाला की वान प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते.