आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबार्शीटाकळी येथील खोलेश्वर संस्थानच्या प्रांगणात नुकताच सर्व शाखीय माळी समाजातील युवक-युवतींचा परिचय मेळावा झाला. या मेळाव्याला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व शाखीय माळी समाजातील सुशिक्षित, अल्पशिक्षित, शेतकरी, शेतमजूर, कामगार व व्यावसायिक युवक-युवतींचा परिचय मेळावा आयोजित केला होता. आजकाल प्रत्येक पालकांना नोकरीवाला मुलगा जावाई म्हणून मिळावा अशी अपेक्षा असते. लग्न म्हटले की, नोकरी व बागायती शेतजमीन असलेल्या मुलांना पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे आजच्या स्थितीत अल्पभूधारक, अल्पशिक्षित, कामगार व शेतमजूर असलेल्या मुलांना विवाहासाठी प्रतीक्षा करावी लागते. नेमका हाच धागा पकडून बार्शीटाकळी तालुक्यातील माळी समाजातील काही समाजबांधवांनी एकत्रित येऊन अल्पभूधारक, अल्पशिक्षित, शेतमजूर, कामगार व व्यावसायिक युवक- युवतीचा परिचय मेळावा आयोजित केला.
या मेळाव्यात तब्बल १२१० युवक- युवतींनी सहभाग नोंदवला. अकोला, बुलडाणा, वाशीमसह इतरही जिल्हे व मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यातून युवक-युवतींचा परिचय मेळाव्यात सहभाग होता. मेळाव्याला आ. हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे सम्राट डोंगरदिवे, जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, अनुसयाबाई राऊत (जि. प. सदस्या), गजानन मानतकर, डॉ. गणेश बोबडे, माया इरतकर, डॉ. संतोष हुसे, सुभाष सातव, जयंत मसने, नितीन देऊळकर, उमेश मसने, मनीष हिवराळे, खंडारे, मीना राऊत (न. पं. सभापती), रामराव भोपळे, केशव राऊत, भारत बोबडे, रमेश वाटमारे, श्याम ठक, संजय वाट, दीपक सदाफळे, श्रीराम येळवनकार, राहुल राऊत, विनोद शेवलकार आदींची यावेळी उपस्थिती होती. या मेळाव्याला, खोलेश्वर संस्थानच्या विश्वस्त मंडळीचे सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.