आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारी १० एप्रिलला अमरावती दौऱ्यावर अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेल्या या मेळाव्याचे आयोजन महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, अमरावती विभागीय समन्वय संजय खोड़के होते. आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार हरिदास भदे, प्रा. विश्वनाथ कांबळे, श्यामराव अवस्थी, प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दीकी,कृष्णा अंधारे, युवक निरीक्षक अनंता काळे, मंदाताई देशमुख ,कार्याध्यक्ष सैयद यूसुफ अली आदींच्या उपस्थितीत हा मेळावा घेतला.
याप्रसंगी विभागीय निरीक्षक संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत असून, ही बाब कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी आहे. तसेच अमरावती येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनकर रनबावळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. या वेळी माजी गटनेते मनोज गायकवाड ,माजी नगरसेवक अजय रामटेके, फैयाज खान, अब्दुल रहीम पेंटर, नितीन झापर्डे, माजी नगरसेवक सुषमा निचळ, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, अफसर कुरैशी, नकीर खान, फरिद पहिलवान, युवक अध्यक्ष अजय मते, देवानंद ताले,बुढन गाडेकर, भारती निम, अख्तर बेगम, रिजवाना शेक, योगेश हुमने, सुधीर कहाकार ,अशोक परलीकर, पापा चंद्र पवार ,हकीम रेडीमेड वाला ,अज्जू कप्तान, संदीप तायडे, ताज नवरंगाबादी, कैलाश कराळे, मुन्ना ठाकुर, शुभम पीठलोड, अविनाश इंगळे, नितिन शिरसागर, आकाश धवसे, अमोल ठोकळ, वैभव घुगे, पृथ्वीराज गावंडे, शौकत अली शौकत, बुरहान मंतुवाले, सलीम गन्ने वाले, वसीम खान ,शौकत अली आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संचालन, आभार बुढन गाडेकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.