आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारांसाठी कामाची बातमी:अकोल्यात महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी मेळावा ; 13 जूनपर्यंत करता येणार अर्ज

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्यागिक प्रशिक्षण संस्था, अकोला व मे.बडवे इंजिनियरींग औरंगाबाद यांच्या सयुक्त विद्यमाने विविध पदांवर भरती करण्या करीता रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना 13 जूनपर्यंत अर्ज वेबसाईटवर सादर करता येणार आहेत, अशी माहिती मुलभूत प्रशिक्षण व अनुषंगिक सूचना केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी दिली आहे.

महिनाच्या दुसऱ्या सोमवारी मेळाव्याचे आयोजन

प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पंतप्रधानाच्या या आवाहनुसार संधाता, शिट मेटल वर्कर, जोडारी, पेंटर,पीपीओ या व्यवसायातील आय.टी.आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना मे.बडवे इंजिनियरींग औरंगाबाद या कंपनीमार्फत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे सुशिक्षित बेराजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या रोजगार मेळाव्याच्या जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

खालील लिंक द्वारे करता येणार अर्ज

तसेच या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://dgt.gov.in/appmela2022/ या वेबसाईटवर जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करुन उपस्थिती नोंदवावी. तसेच अधिक माहिती करता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...