आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार समारंभ:बोर्डीत गुणवंत विद्यार्थी, गुणरत्नांचा सत्कार

अकोट7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री नागास्वामी महाराज संस्थान बोर्डी येथे उपसरपंच राजेश भालतिलक मित्रपरिवाराच्या पुढाकाराने ग्रामपंचायत बोर्डी, ग्रामवासीयातर्फे विविध कार्यक्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत बोर्डीचे नाव उज्वल करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ६ मार्चला झाला.

या कार्यक्रमाला ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, अध्यक्ष म्हणून बोर्डीचे आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण सोळंके होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, माजी आमदार संजय गावंडे, माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, असंघटित कामगार काँगेसचे अध्यक्ष मो. बदृजमा, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रदीप वानखडे, कार्याध्यक्ष काँगेसचे महेश गणगणे, मिलिंद नितोने, जजिल्हा परिषदेचे सदस्य जगन निचळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब बोंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन डाफे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश आतकड, तालुकाध्यक्ष काँगेस कमिटीचे प्रशांत पाचडे, पंचायत समिती सदस्य रमेश अकोटकर, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक राम भास्कर, डॉ. गोपाल सिकवाल, डॉ. सूरज व्यवहारे, डॉ. सलमान शेख, संजय आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते बोर्डीतील ३६ गुणवंत विद्यार्थ्यी, प्रतिष्ठित शेतकरी, युवा उद्योजक यांचा सत्कार केला. या वेळी मुसळी किंग औषधी वनस्पती लागवड भारत भर प्रसार करणारे जगन्नाथ धर्मे, मुख्याध्यापक उमेश चोरे यांचा सत्कार केला. या वेळी बोर्डीचे उपसरपंच राजेश भालतिलक, सरपंच स्वाती चंदन, सदस्य रमेश राऊत, गजानन डवंगे, मो. साजिद, लीला भगत, दीक्षा रजाने, चंद्रकला रिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल ताडेसह आदी ग्रामवासी उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच राजेश भालतिलक, सूत्रसंचालन विष्णू पखाले यांनी केले.आभार राजेश खीरकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...