आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विषेश:सेप्टिक टँकच्या व्हेंटपाइपला जाळी लावा, डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वैद्यकीय-आरोग्य विभागाचे आवाहन

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डासांचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सेप्टिक टॅकच्या व्हेटपाईपला जाळी लावावी, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

या संदर्भात महापालिका वैद्यकीय-आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इतर आजाराचे प्रमाण जास्त होतांना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात डेंग्यु आजाराच्या रुग्णामध्ये कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. वर्ष भरात डेंग्यु आजाराने एकही रुग्ण दगावलेला नाही. डेग्यु तापाचा प्रादर्भाव कमी करण्यासाठी मलेरिया विभागाच्या वतीने सर्वतोपरी पयत्‍न करण्यात येत आहे. डेग्यु जोखीम ग्रस्त भागाची विविध पद्धतीने तपासणी करुन त्या भागात किटक शास्त्रीय सर्वेक्षणा अतर्गत तापसर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षणात डास अळीनाशकाचा उपयोग करून डासांची घतता कमी करणे, कोरडा दिवस पाळणे, फवारणी, धुरळणी करणे व स्वच्छतागृहाच्या व्हेंटपाईपला नायलोन डास रोधक जाळीदार टोपी लावणे किंवा पातळ कापड बांधणे आधी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्‍या आहेत व सुरू आहे. यावर्षी डेंग्यु तापाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यु दिना निमित्त डेग्यु प्रतिबंधाकरिता आपल्या घरापासुन सुरुवात तसेच हिवतापाला झिरो करु, माझ्या पासुन सुरुवात करु हे ब्रीद वाक्य असून, यावर्षाची राष्ट्रीय डेंग्यु दिनाची संकल्पना आहे. यानुसार शहरात डेंग्युचा प्रसार रोखण्याकरिता कामे करण्यात येत आहे. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्टॉय नावाच्या डासांच्या मादी मार्फत पसरविल्या जातो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.

डासांचा प्रादुर्भावामुळे हिवताप, डेग्यु, चिकुनगुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक जीव घेणे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक अभ्यासाअंती असे आढळुन आले की डासांची ३० ते ४० टक्के उत्पत्ती ही सेप्टीक टँकमध्ये होते. व्हेंटपाईपला नायलॉन जाळीदार टोपी किंवा पातळ कापड बांधल्यास डासांच्या वाढत्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे आढळुन आले आहे.

ही बाब लक्षात घेवून मलेरिया विभागाव्‍दारे शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, हिवताप, डेग्यु, चिकुन गुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक जीव घेणे आजार मोठ्या प्रमाणात पसरु नये म्हणुन नागरीकांनी आपल्या व्‍हेंटपाईपला नायलॉन जाळीदार टोपी,कॅप लावावा किंवा पातळ कापड बांधावा.

नोंदणी झालेल्या १ लाख ९७ हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न
आवश्यक कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी. एप्रिल महिन्यापासून मिळणाऱ्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधिताना दिले.

बातम्या आणखी आहेत...