आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वारकऱ्यांना ग्वाही:देवी-देवता, संतांबाबत अपशब्द बोलणाऱ्यांवर कारवाई होणार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवता संतांबाबत अपशब्द बोलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, वारकऱ्यांसाठी सरकार सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दहा वारकरी संघटना प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीची माहिती विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी दिली

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांवर, देवी देवतांवर, संत महंतावर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहे. काही धार्मिक संघटना, राजकीय पक्ष आंदोलने करीत आहेत.

यापार्श्वभूमीवर नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व गणेश महाराज शेटे व इतर दहा वारकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना वारकरी फेटा बांधून विना व श्री गजानन विजय ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निवेदनही सादर करण्यात आले.

याप्रसंगी हभप गणेश महाराज शेटे, रमेश महाराज वाघ सदानंद महाराज साधू , पुरुषोत्तम महाराज पाटील सोपान महाराज सानप शास्त्री , योगेश महाराज सुरळकर, माधवराव बकाल, ओम देव महाराज चौधरी, विठ्ठल महाराज चौधरी,यश नागपुरे, किरण महाराज शिंदे, आकाश भुतेकर, डॉ. गजानन पाटील, एकनाथ महाराज तायडे ,विश्वेश्वर जगन्नाथराव इंगोले, सारंगधर बोंडे, दिनकर पाटील, प्रवीण महाराज काटकर , मयूर महाराज दरने, राहुल महाराज हजारे , प्रकाश महाराज खंडारे उपस्थित हाेते.

कठाेर कायदा हवा

काेणत्याही धर्मातील देवी देवता, संत, महापुरुष यांबाबत अपशब्द वापरल्यास त्यांच्यावर तातडीने कार्यवाही हाेण्यासाठी कठाेर कायदा हिवाळी अधिवेशनात मांडण्यात यावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली. लव्ह जिहादसारख्या प्रकरणाला आळा बसावा, यासाठीही कायदा व्हावा, असेही वारकरी म्हणाले.

गुन्हा दाखल करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर पाठविण्यात यावे, अशीही मागणी केली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांनी देवी देवता, संतांबाबत केलेल्या िवधानाची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...