आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य विज्ञान अभियंत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या एमएचटि-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा- 2022 चे 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत दोन सत्रात आयोजन केले आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण चार उपकेन्द्रावर आयोजन केलेले आहे. या परीक्षा केंद्रावर जिल्ह्यातील एकूण 16 हजार 916 परिक्षार्थीचे नियोजन केले आहे, अशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी बुधवारी रात्री दिली.
एमएचटी-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूरचे एस.आर. पाटील तर शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूरचे पी.डी.पाटील हे जिल्हा संपर्क अधिकारी तसेच केंद्र प्रमुख एम.आर.ई.जि.एस ज्यु.इंजिनियर अकोलाचे गुंज राठोड व जिल्हा परिषद उपविभागीय ग्रामीण पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता जयंतीलाल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नियोजीत वेळेत परिक्षा केंद्रावर हजर राहावे. ॲडमिट कार्ड व ओरिजनल ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच संबंधित परिक्षा केन्द्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
हे आहेत केंद्र
- अकोला जिल्ह्यातील एकूण चार उपकेन्द्रावर दोन सत्रामध्ये एमएचटि-सिईटी सामाईक प्रवेश परीक्षा होणार आहे.
- कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या परीक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 3850 तर पीसीबी ग्रुपचे 4208 विद्यार्थी.
- मानव स्कुल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी व्याळा या परीक्षा केंद्रावर पीसीबी ग्रुपचे 1798 विद्यार्थी,
- संतोष कुटे एक्सामिनेशन सेंटर अकोला या परीक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 233 विद्यार्थी तर पीसीबी ग्रुपचे 1199 विद्यार्थी व
- श्री इनफोटेक कापसी या परीक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे 2691 तर पीसीबी ग्रुपचे 2937 विद्यार्थी उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.