आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के:बार्शी टाकळी येथे जाणवले धक्के ; 3.50 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कोणतीही जीवितहानी नाही

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के अकोला, बार्शी टाकळी जवळ अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर आज सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून मालमत्तेचे वा कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवामान विभाग अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे माहिती दिली आहे.त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजून 41 मि.18 सेकंदांनी या धक्क्याची नोंद झाली. 20.530 N व 77.080 E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर 3.50 इतकी तीव्रता नोंदविण्यात आली.या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

गतवर्षीही बसले होते धक्के

  • अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात 17 एप्रिल 2021 ला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता.
  • तो धक्का 3 रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद घेण्यात आली होती. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक 19 किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.
  • तेव्हाचा भूकंप 20.73 अक्षांश आणि ७६.८३ रेखांशदरम्यान १६ किलोमीटर खोलीवर जाणवला होता.
  • यापूर्वी जिल्ह्यात 23 जून 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता 3.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
बातम्या आणखी आहेत...