आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्किस बानो खटला:दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द करण्याची एमआयएमची मागणी; ताेंडवर काळे रुमाल झाकून निदर्शने

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील बिल्किस बानो खटल्यातील दाेषींची सुटका करण्याच्या निर्णयाचे शुक्रवारी दुपारी अकाेल्यात संतप्त पडसाद उमटले. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ऑल इंडिया मजलीस इत्तेहादुल अर्थात एमआयएमने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. काही कार्यकर्त्यांनी ताेंडावर ताेंडवर काळे रुमाल झाकून सुटकेच्या निर्णयाचा निषेध केला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदाेबस्तही तैनात करण्यात आला हाेता.

सन २००२ च्या गुजरात दंगलीदरम्यान बिल्किसवर सामूहिक अत्याचार करण्यता आले. तसेच त्यांच्या ३ वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली हाेती. मात्र, गुजरात सरकारने जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांना आराेपींची १५ ऑगस्ट रोजी सुटका केली हाेती.

या निर्णयाचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातून िनषेध हाेत असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सुटकेच्या निर्णयावराेधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने गुजरात सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान आराेपींच्या सुटकेच्या निर्णयािवराेधात एमआयएमने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी एमआयएमचे महानगर सरचिटणीस आसिफ अहमद खान, जमीर खान, इरफान खान, जावेद खान, चांद खान, तनवीर अहमद खान, कृष्णा गवई, साैरभ खंडारे, हुजेर खान, सद्दाम कादरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.

लज्जास्पद निर्णय

गंभीर गुन्हा असलेल्या आणि मानवतेला कळिमा फासणाऱ्या खटल्यातील दाेषींच्या सुटकेचा निर्णय लज्जास्पद असल्याची टीका एमआयएमने निवेदनात केली. हा निर्णय स्वातंत्र्य िदिनाच्यानिमित्ताने घेण्यात आला. गुजरातमधील भाजप सरकारकडून घेतलेला निर्णय योग्य नाही. अत्याचाराच्या खटल्यात आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या आराेपींची क्षमा धाेरणाअंतर्गत सुटका करणे याेग्य नाही, असेही एमआयएमचे म्हणणे आहे.

दाेषींचा सन्मान करणे अमानवीय कृत्य

खून-अत्याचार खटल्यातील आराेपींना माफ करण्याच्या निर्णयातून भाजपच्या गुजरात सरकारची संवेदनहिनता दिसून येते, अशा शब्दात एमआयएमने संताप व्यक्त केला. गर्भवतीवर सामुहिक अत्याचार करून, तिच्या मुलीसह कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. आपण महिला असल्याने महिलेची वेदना समजू शकता, असेही एमआयएमने राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदन नमूद केले आहे. तसेच काहींकडून या आराेपींचा सन्मान हाेत असून, हे कृत्य अमानवीय आहे. दाेषींची तातडीने कारागृहात रवानगी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...