आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावणात बदल:किमान तापमान 10.6 अंशांवर; यंदाच्या मोसमातील नीचांकी

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे. शनिवारी, १० डिसेंबरला किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस नोंदवले. त्यामुळे हा यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापामाना दिवस ठरला. यापूर्वी ९ डिसेंबरलाच ११.३ अंश सेल्सिअस नोंद झाली होती. ही निचांकी मोडत तापमान २४ तासात घसरले. तमिळनाडू किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वातावणात बदल दिसत आहे.

यामुळे ५ डिसेंबरपासून तापमानात घसरण होत आहे. ५ तारखेला किमान तापमान १८.५ अंशावर होते. तेव्हापासून घट होताना दिसत आहे. सहा दिवसात जिल्ह्याच्या किमान तापमानात ७.९ अंशाने घट झाली. हवामान संशोधन केंद्राकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ११ डिसेंबरपर्यंत वातावरण कोरडे राहील. १२ डिसेंबर व १३ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...