आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील किमान तापमानात शुक्रवारी किरकोळ घट झाली असून पारा १३.५ अंशावर नोंदवला गेला. रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत जिल्ह्याला हुडहुडी भरत आहे. दरम्यान गेल्या काही वर्षातील तापमानातील घसरण पाहता डिसेंबर महिन्यात किमान पारा १० अंशाच्या आत येण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सियसवर राहत आहे. ऑक्टोबर अखेरपासून सुरू झालेल्या थंडीत नोव्हेंबर महिन्यात बऱ्याच प्रमाणात चढउतार झाला. ग्रामीण भागात सायंकाळ पासूनच थंडीची हुडहुडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. रब्बी हंगामातील कामगिरीसाठी शेतकऱ्यांना रात्री आणि पहाटेच शेत शिवार गाठावे लागते. त्यामुळे थंडीचा सामना करणे असह्य ठरत आहे. आता डिसेंबर महिन्यात आणखी पारा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दहा वर्षातील डिसेंबरमधील थंडी वर्ष दिनांक किमान तापमान २०१२ २७ डिसेंबर ८.८ २०१३ १३ व १५ डिसेंबर १०.० २०१४ २९ डिसेंबर ७.१ २०१५ २६ डिसेंबर ७.५ २०१६ २७ डिसेंबर ८.३ २०१७ २७ डिसेंबर ९.४ २०१८ २९ व ३० डिसेंबर ५.९ २०१९ २९ डिसेंबर ८.६ २०२० २१ व २२ डिसेंबर ९.६ २०२१ २१ डिसेंबर ११.०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.