आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी गायब:किमान तापमान 5 अंशांनी वाढले ; ढगाळ वातावरणासह उकाडा, तुरीवर अळीच्या प्रादूर्भावाची शक्यता

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. सोमवारी, ५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास जिल्ह्यात किमान तापमानाची १८.५ एवढी नोंद झाली आहे. कमी झालेली थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल दिसून येत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून अंशत ढगाळ वातावरण असल्याने दररोज किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होत आहे. उत्तरेकडील राज्यात किमान तापमानात चढउतार होत आहे. परिणामी विदर्भातही वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. विदर्भात सोमवारी सरासरी किमान तापमान हे १५ ते १८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. अकोला आणि बुलढाणा १८ अंश सेल्सिअस, अमरावती, वर्धा व यवतमाळ १६ अंश तर चंद्रपूर १७, नागपूर १५ अंश सेल्सिअस असा किमान पारा राहिला.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी जिल्ह्यात रात्रीचे किमान तापमानही सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तापमानातील ही घसरण अधिक काळ टिकण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र, नागपूर यांच्या माहितीनुसार मंगळवार ६ डिसेंबरपर्यंत वातावरण कोरडे राहील. दरम्यान सोमवारीही जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण होते. गेल्या आठवड्यापासून हे वातावरण कायम असल्याने शिवाय रात्री तापमान कमी असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावासाठी वातावरण अनुकुल आहे.

तापमान १३ वरून १८ अंशावर शुक्रवार २ डिसेंबरला अकोला जिल्ह्यातील किमान तापमान १३. ५ अंशावर होते. त्यामध्ये अवघ्या तीन दिवसात ५ अंशाने वाढ झाली असून, सोमवारी, ५ डिसेंबरला १८. ५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

बातम्या आणखी आहेत...