आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. विशाल उर्फ कल्लू शेषराव उमाळे (वय २९ वर्ष रा. शिवणी) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय?
पीडित मुलगी २१ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान शिवणी येथे टायपिंगचा क्लास करून संध्याकाळी ६.३० वाजता जुना हायवे नं. ६ ने सिद्दीकी गॅरेज समोरुन घरी परत येत होती. यावेळी गॅरेजसमोर ऑटो रिक्षातून तिच्या वडिलांच्या ओळखीचा आरोपी विशाल उर्फ कल्लू उमाळे हा पीडितेसमोर आला. त्यावेळेस तो दारू पिलेला होता. यावेळी त्याने मुलीचा पाठलाग करून विनयभंग केला. पीडित मुलगी घरी पोहचल्यानंतर तिने तिच्या आई - वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला. पोलिसांनी कलम ३५४, ३५४-ड भादंवि. पोक्सो कायदयाचे कलम ११, १२ नुसार गुन्हा दाखल केला होता.
सहा साक्षीदार तपासले
सदर गुन्हयाचा तपास करून तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानून न्यायालयाने आरोपी विशाल उर्फ कल्लू शेषराव उमाळे याला भादवि. ३५४, ३५४-ड व पोक्सो कायदयाचे कलम ११, १२ अंतर्गत दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा वन५ हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून अनुराधा महल्ले व सोनू आडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.