आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पसंख्याकांनी हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी, आयुष्यात स्वतःला हवे आणि ते मिळवण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे,’असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी रविवारी १८ डिसेंबरला केले.
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, अधीक्षक मीरा पागोरे, सहाय्यक अधीक्षक अतुल सोनवणे, शैक्षणिक गुणवता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया, पी.जे. वानखडे, प्रभाजितसिंग बछेर, अलीम देशमुख, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन महल्ले यांनी केले.
विद्यार्थ्यांचे शंका निरसन
चर्चासत्रामध्ये उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासनाच्या योजना, निकष व अंमलबजावणीबाबत प्रश्न केले. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सहभागी वक्त्यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासन योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याबाबत प्रशासनान, अल्पसंख्याक समुदायाने मिळून प्रयत्न करावे, असे मत व्यक्त केले. अल्पसंख्याकांनी अधिकार जाणून आपला विकास व देशाप्रती कर्तव्य पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.
याेजना पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामील होतील, त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे, असे प्रभारी जिल्हाधिकारी खडसे म्हणाले. शासनाद्वारे अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या योजना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचतील याकरीता प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.