आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी द्यावा:अल्पसंख्याक समाज 25 टक्के; बजेटमध्ये 10 टक्के निधी द्यावा

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्याक समाज एकूण लोकसंख्येच्या २० ते २५ टक्के असून, यातील सर्वच समाज घटकांसाठी अर्थसंकल्पात किमान १० टक्के निधीची तरतूद आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीआे फाेरमचे (एमएमएनफ) संस्थापक अध्यक्ष जाकीर हुसेन शिकलगार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अल्पसंख्याकांच्या अनुषंगाने काेणतेही सरकार सकारात्मक नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. एमएमएनफ गत अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सामाजिक कार्य करत आहे.

बातम्या आणखी आहेत...