आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित करा:चुकीचा फेरफार; मंडळ अधिकारी; तलाठ्याला निलंबित करा

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हटके आंदोलन केले. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, या मागणीसाठी महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने सांगळूद येथील शेतीचा चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्याने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी गोविंद गिरी यांनी मोबाइलवर चढून आंदाेलन केले. शहरातील अकोट फैलातील मोबाइल टाॅवरवर चढून त्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अकोट फ़ैल पोलिसांना आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

काय आहे मागणी?ः अकोला तालुक्यातील सांगळूद येथील गट नं. २१९ बबन डोंगरे यांच्या मालकीच शेत असून, त्यांच्या शेतीची खरेदी काही दिवसांपूर्वी झाली. ही खरेदी रद्द करावी, यासाठी डोंगरे यांनी न्यायालय, उपविभागीय कार्यालयात धाव घेतली. न्यायालयात अन् उपविभागीय यांच्या दालनात खटला सुरू असतानाही मंडळ अधिकाऱ्याने व तलाठी यांनी चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्यामुळे डोंगरे यांना मानसिक त्रास झाला. अशाप्रकारे पदाचा दुरुपयोग करून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतीचा फेरफार घेतला असून, त्यामुळे या दोघांवरही निलंबनाची कारवाई करावी, यासाठी ‘प्रहार’चे मनीष गिरी यांनी मोबाइलवर टाॅवरवर चढून
आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...