आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • MLA Amol Mitkari Again Rained Down On Fadnavis Devendra Fadnavis Is Working To Oust OBCs And Marathas Through The Legislative Council

आमदार मिटकरी फडणवीसांवर बरसले:विधान परिषदेच्या माध्यमातून ओबीसी, मराठ्यांना डिवचण्याचे काम देवेंद्र फडणवीस करताहेत

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेसाठी भाजपाने नावे जाहीर केली. त्यात अमरावतीचे श्रीकांत भारतीय यांचा नावाचा समावेश आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, ओबीसी व मराठा समाजातील नेत्यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचे काम फडणवीस करताहेत.

देवेंद्र फडणवीस हुकुमशाह

आमदार मिटकरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हेच कसे हुकुमशाहा आहेत हे यावरून सिद्ध होते. त्यांनी ओबीसी समाजातील मराठा समाजातील नेत्यांना डिवचण्याचे प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक डावलले आहे. त्यांना राज्यसभा तसेच विधानपरिषदेवरसुद्धा संधी दिलेली नाही. एकहाती सत्ता घेऊन मिरवणारा व्यक्ती म्हणजे फडणवीस आहेत. ते जाणीवपूर्वक सर्वसामान्यांना डावलण्याचे प्रयत्न करतात का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे.

मुुंडेंना का डावलले?

ज्यांनी भाजपा वाढवण्यासाठी जीवाचे रान केले त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक राज्यसभा आणि विधान परिषदेचा त्यांचा पत्ता कट केला, हे षडयंत्र आहे. फडणवीस यांनी आपले माजी स्वीय सहायक अभिमन्यू पवार आणि श्रीकांत भारतीय या दोघांनाही अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद दिली आहे.

मविआवर टीका करणाऱ्यांना काही नाही

महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणाऱ्यांपैकीचे नाव म्हणजे विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांना तर कशातच ठेवले नाही. संधी मिळेल अशी त्यांना कालपर्यंत गँरंटी होती. मात्र त्यांनाही जाणीवपूर्वक डावलले आहे. केशव उपाध्ये यांना तर भजन म्हणण्यासाठी तेवढे शिल्लक ठेवले आहे, असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे. भाजपा जाणीवपूर्वक ओबीसी चेहऱ्यांना डावलत आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याचेही मिटकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...