आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांवर सर्वोपचार‎ रूग्णालयात उपचार सुरू:पारस येथील दुर्घटनेतील जखमींची‎ आमदार मिटकरींनी केली विचारपूस‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारस येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या‎ भाविकांची विचारपूस करण्यासाठी‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल‎ मिटकरी हे मंगळवारी सर्वोपचार‎ रूग्णालयात गेले होते. त्यांनी जखमींची‎ विचारपूस करीत डॉक्टरांना योग्य‎ उपचाराबाबत योग्य सूचना दिल्या.‎ पारस येथे गुरूवारी बाबुजी संस्थान‎ येथे संध्याकाळी आरती सुरू असताना‎ सोसाट्याच्या वादळीवाऱ्याने दीडशे‎ वर्षापूर्वीचे कडूलिंबाचे झाड टीनशेडवर‎ कोसळले होते. त्यात सात जिल्ह्यातील‎ सात भाविकांचा मृत्यू झाला होता. तर‎ २९ भाविक जखमी झाले होते. या‎ जखमी भाविकांवर सर्वोपचार‎ रूग्णालयात उपचार सुरू आहेत.‎

मंगळवारी आमदार अमोल मिटकरी‎ यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन‎ विचारपूस केली.‎ या वेळी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मीनाक्षी गजभीये, राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षाचे संघटन सचिव कृष्णा अंधारे,‎ महानगर युवक अध्यक्ष अजय मते व‎ पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.‎