आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:चंद्रशेखर बावनकुळे खरे दूध न पिलेला माणूस; त्यांची औकात काय, तो मतिमंद माणूस, नितीन देशमुखांचा हल्लाबोल

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, ते बाळासाहेबांच्या पुण्याईने बाहेर आहेत असे म्हटले होते यावर नितीन देशमुख म्हणाले की, खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्याकडे पाहिले तर ते मतिमंद वाटतात.

नेमके काय म्हणाले देशमुख?

आमदार नितीन देशमुख म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांची औकात काय? असा प्रश्न केला आहे. तर भाजपकडे तो खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आहे असा टोलाही लगावला आहे. तर त्यांच्याकडे पाहिले तर ते मतिमंद वाटतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू न देण्याची भाषा मतिमंद माणसाने करू नये असा टोला नितीन देशमुख यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही.

भाजपच्या नेतृत्वाने विश्वासघात केलेल्या लोकांना जागा दाखविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत आमदार निवडून आणले, आणि नंतर त्यांनी बेईमानी करत मविआसोबत सत्ता स्थापन केली. विश्वास घाताचे राजकारण कुणी संपवले हे सर्वांना माहिती आहे, मोदी आणि अमित शहा यांनी विश्वासघातक्यांना संपवले आहे, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे मराठवाड्यात येण्याचे, त्यांनी सत्तेत येताच वॉटर ग्रीड योजना रद्द करण्यात आली, त्यामुळे सर्व जिल्हे पाण्याखाली असते. संभाजीनगरचा निर्णय केंद्र सरकार करणार होते. केंद्रात उद्धव आहे का असा एकेरी सवालही त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने मान्यता दिली, सत्तेतील मंत्रिपद गेल्याने सर्व जण सत्ता वापस मिळविण्यासाठी खोटे बोलत आहेत. पीक विमा कंपन्याना पोसन्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.