आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गावं प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिली असून, या विवराेधात नागपूरला धडक देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अकाेला ते नागपूर २५० कि.मी. पायी दिंडी काढण्यात येणार असून, खारपाण पट्यातील पाण्याचा टॅंकरसाेबत राहणार आहे. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याची आणि त्याच पाण्याने अंघाेळ करण्याची विनंती करणार असल्याचेही आ. देशमुख म्हणाले.
याेजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियाेजन आहे. त्यापैकी २७ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवािहनी टाकण्यात आली आहे. अंतर्गत २२८ पैिक १०८ कि.मी. अंंतरापर्यंतचीही जलवािहनी टाकण्यात आली आहे. २१९ काेटींच्या या याेजनेवर आतापर्यंत १२५ काेटींचा खर्च झाला असून, स्थगिती देऊन राजकारण करणे याेग्य नसल्याची टीका आ. देशमुख यांनी केली.
पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, नितीन ताकवाले, अनिल परचुरे, गजानन चव्हाण, अजय जाधव आदी हाेते.
सत्ता देऊनही अकाेल्यावर अन्याय
सन २०१७मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत अकाेलेकारांनी भाजपला सत्ता दिली. मात्र अमृत याेजनेअंतर्गतही पाणी आरक्षणाला फडणवीस सरकारने स्थगिती दिली. अकाेला पूर्व व पश्चिममध्ये भाजपचे दाेन आमदार असून, ही स्थगिती उठविण्याची हिहंम्मत त्यांच्यात नाही काय, असा सवाल आ देशमुख यांनी केला.
...तर उपमुख्यमंत्र्यांनाही कळेल
पायी दिंडीचा श्रीगणेशाला १० एप्रिल राेजी अकाेल्यातील राजेश्वर मंदिरापासून हाेणार आहे. २१ तारखेला उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दिंडी पाेहाेचणा आहे. खारपाण पट्यातील ग्रामस्थांना खारेपाणी पिल्याने किडनीसह अन्य आजार हाेत असून, किमान दिंडीतून तरी याची जाणीव उपमुख्यंत्र्यांना हाेईल, असे आ. देशमुख म्हणाले.
लाखाेंची बचत
वान प्रकल्प ते याेजेनेेचे अखेर गाव असलेले काजीखेड हे अंतर ४५ कि.मी. असल्याचे आ. देशमुख म्हणाले. वानमधून पाणी पुरवठा झाल्यास पंपींगसाठी अर्थात विद्युतसाठी प्रती माह ४० लाख रुपयांचा बचत हाेणार आहे. तसेच बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेजचे पाणी पिण्यास याेग्य नाही. कवठा बॅरेजमधून याेजनेला पाणी पुरवठा हाेऊ शकताे, असे म्हणणणारे भाजपचे नेते दिशाभूल करीत असल्याची टीका आ. देशमुख यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.