आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा:हरभरा खरेदीवरून आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर ; हरभरा खरेदी सुरू करण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना सूचना

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही त्यांचा बारदान्याअभावी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे उपजिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळ खरेदी सुरु करण्याच्या सूचना दिल्या. हरभरा खरेदी मध्ये नाफेड तर्फे बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अधिकारी, प्रशासन यांची बैठक करून ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व प्रशासनाने नाफेड अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले. जिल्ह्यात १३ केंद्रांवर नाफेडच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. नाफेडकडून बंद केलेल्या हरभरा खरेदीला अखेर मंगळवारी सुरूवात करण्यात आली होती. राज्य को. ऑपरेेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे खरेदीची प्रक्रिया राबवली. शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत विक्रीसाठी नाेंदणीही केली. मात्र हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत नाफेडमार्फत सुरू असलेली हरभरा खरेदी मुदतीपूर्वी २३ मे रोजीच पूर्वसूचना न देता बंद केली होती. ५२३० रुपये हमीभाव असताना शेतकऱ्यांना खासगी बाजारात हमी भावापेक्षा ८०० ते १००० रुपयांनी कमी भावात विक्री करावी लागली. जिल्ह्यात १३ केंद्रांवर नोंदणी केलेल्यांपैकी ५,१२९ शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएसच गेले नसल्याने ते खरेदीपासून वंचित आहेत. केंद्र शासनाच्या पत्राचा संदर्भ देत सहकार, पणन विभागाने हमी भावाने हरभरा खरेदी प्रक्रियेला १८ जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा शासनादेश जारी केला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी, शंकरराव वाकोडे, अनिल गावंडे, माधव मानकर, अंबादास उबाळे, राजेश बेले, जयंत मसने, प्रवीण हगवणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...