आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला माता आणि नवजात शिशू देखभाल कक्ष (एमएनसीयू) पश्चिम विदर्भातील शेकडो नवजात शिशूंसाठी संजीवनी ठरत आहे. ४० खाटांची क्षमतेचा हा कक्ष राज्यात सर्वात मोठा असून, दरवर्षी सरासरी १२०० ते १५०० मुलांवर या कक्षाच्या माध्यमातून उपचार केले जातात.नवजात शिशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा स्त्री रुग्णालय अद्ययावत झाले येथील एसएनसीयू अर्थात विशेष नवजात शिशू देखभाल कक्ष, एमएनसीयू म्हणजे माता व नवजात शिशू देखभाल कक्ष हे दोन्ही कक्ष पश्चिम विदर्भासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवणी ठरत आहेत. दोन्ही कक्षातून वर्षाला सरासरी ३५०० नवजात शिशूंवर उपचार केले जात आहे. अलिकडे जिल्ह्याच्या विविध रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलांचे नवजात शिशू उपचारासाठी या कक्षात दाखल केले जात आहे. एसएनसीयू आणि एमएनसीयू या दोन्ही कक्षांची एकूण क्षमता ही ८४ खाटांची आहे. त्यापैकी एमएनसीयूमध्येच माता व शिशूला एकत्र राहता येते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ, इन्फेक्शन झालेल्या बाळांना पुढील उपचारासाठी या कक्षात ठेवले जाते. एसएनसीयूमध्ये बाळ एकटे असते. या कक्षात २८ दिवसांपर्यंत उपचार दिले जातात. तर एमएनसीयूमध्ये कमीत कमी पाच दिवस जास्तीत जास्त १४ दिवस या कक्षात शिशूंवर उपचार केले जातात. अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉ. अर्चना फडके यांनी दिली.
कांगारू मदर केअर पद्धतीत माता, शिशू राहू शकतात
मुदतपूर्व प्रसूती झालेली असल्यास किंवा बाळाचे वजन खुप कमी असल्यास अशा बाळाला ऊब, पोषण आणि स्वच्छता मिळणे आवश्यक असते. त्यामुळे एमएनसीयूमध्ये कांगारू मदर केअर (केएमसी) या पद्धतीत माता आणि शिशू राहू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.