आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबार्शीटाकाळी तालुक्यातील परंडा ग्राम पंचायतमध्ये ग्रामविकास याेजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करीत साेमवारी (ता. 20) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण करण्यात आले.
मनसेने दिले निवेदन
याप्रकरणी मनसे नेत्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवेदनत देत कार्यवाहीची मागणी केली. परंडा ग्राम पंचायत अंतर्गत ग्राम विकासाच्या विविध याेजना राबविण्यात आल्या. मात्र, यात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप उमेश सिदाजी काकाटे यांनी िजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
याबाबत लेखी तक्रारीही केल्या तसेच माहिती अधिकारान्वये माहितीही मागितली. अपिलमध्ये गेल्यानंतरही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
साेमवारी जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठालराव लोखंडकर यांच्या मार्गदर्शानाने अकोला जिल्हाअध्यक्ष पंकज साबाळे यांच्या नेतृत्वात उमेश कोकाटे यांनी उपोषण केले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सचिन गाव्हाळे, महिला जिल्हाअध्यक्ष प्रशंसा अंबेरे , मनविसे जिल्हाअध्यक्ष भूषण भिरड , मनविसे उपजिल्हाअध्यक्ष डॉ. जय मालोकर , शिव मेघाडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. या प्रसंगी प्रफुल इंगोले, पवन वानखेडे, चंदु वानखेडे, शंकर कटोले, अक्षय ठाकरे, अक्षय कटोले आदी उपाेषणकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काही मागण्या नमूद केल्या आहेत. यात ग्राम पंचायतचे गत तीन वर्षांचे लेखा परिक्षण करण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, व्यायाम शाळा बांधण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.